कोल्हापूर : शिवाजी पेठेतील अवचित पीर तालीमीच्यावतीने शिवाजी तरुण मंडळाचा विजयी फुटबॉल संघाचे खेळाडू, तसेच अवचित पीर तालमीचे जुन्या शिलेदारांचा शाल, गुलाबपुष्प व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
शिवाजी तरुण मंडळाने या वर्षात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल तसेच ज्यांनी फुटबॉलची सुरवात मित्रपरिवार या नावाने सुरवात केली अशा सर्व खेळाडूंचा अवचित पीर तालमीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अवचित पीर तालमीचे शिवाजी पेठेसाठी सदैव योगदान राहिले आहे आणि यापुढेही राहील, असे सांगून जुन्या खेळाडूंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी मंजित माने, अनिल इंगवले, राजू समर्थ, राजेश लाड, विक्रम पाटील, विक्रम साळोखे, वैभव जाधव, प्रशिक्षक अमर सासणे, संदेश इंगवले, सुहास चव्हाण आदी उपस्थित होते.