कोल्हापूर : शेतजमिनीच्या वारसा नोंदीसाठी पाच हजार रुपयांची मागिल्याप्रकरणी आंबा (ता. शाहूवाडी) येथील मंडल अधिकारी संतोष सांगडे याच्यासह पंटर मुबारक उस्मान मुजावर (रा. विशाळगड,) याच्याविरुद्ध शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबा येथील मंडल अधिकारी संतोष सांगडे यांच्याकडे शेत जमिनीच्या वारसा नोंदीसाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. मंडल अधिकारी सांगडे यांनी पंटर मुबारक मुजावर याच्यामार्फत पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असल्याचे, चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मंडल अधिकारी संतोष सांगडे व पंटर मुबारक मुजावर या दोघांवर शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पंटर मुबारक मुजावर यास अटक करण्यात आली असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.