प्रविण दरेकर यांची सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या स्मारकाला भेट

 कोल्हापूर : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराचांचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी गावातील स्मारकाला भेट देऊन त्याचे दर्शन घेतले.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील ‘नेसरी’ हे गाव मराठी माणसाच्या मनात पराक्रमाचे स्फुल्लिंग चेतवणारे गाव आहे. यावेळी संपुर्ण स्मारकाची पाहणी दरेकर यांनी केली. केली. यावेळी भाजप नेते शिवाजी पाटील, सुरेश पाटील, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.