भाव वाढले म्हणून लोकांनी दारू पिणं सोडलं का : सदाभाऊ खोत

चाळीसगाव : मला सांगा महागाई कुठे आहे? सोने २० हजार रुपये तोळ्यावरून ५० हजारांवर पोहोचले मात्र लोक सोने खरेदी करतच आहेत. महागाई वाढली म्हणून लोकांनी दारू पिणे सोडले का? उलट कांदा, डाळींच्या किमती वाढल्या तर शेतकरी सुखी होईल, महागाईचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो, असा दावा माजी मंत्री, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केला.

सदाभाऊ खोत हे चाळीसगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना महागाईबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर खोत यांनी महागाईचे समर्थन केले. ते म्हणाले, इतर कोणताही पक्ष महागाईचे समर्थन करण्याचे धाडस करणार नाही, मात्र मी ते धाडस करतो. कुठे आहे महागाई, मला हे सांगा. आता महागाई म्हणतं असाल तर सोनं २० हजार रुपये तोळ्यावरून ५० हजारांवर गेले. पण लोक खरेदी करतायतच. महागाई वाढली म्हणून लोकांनी दारू पिणं सोडलं का? उलट कांदा, डाळीच्या किंमती वाढल्या तर शेतकरी सुखी होईल, महागाईचा शेतकऱ्यांना फायदाच होईल.