सिध्दनेर्ली : सिध्दनेर्ली येथे वीज मीटर घराबाहेर बसवायचे आहे, त्यासाठी पैसे भरा असे सांगत एका भामट्याने वीज ग्राहकांना हजारो रुपयांचा गंडा घातला.
याबाबत आधिक समजलेली माहिती अशी, सिध्दनेर्ली येथे एक युवक तुमचे घरगुती वीजेचे मिटर घराचे बाहेर बसवायचे आहे,त्यासाठी पेटी बसविणेकरीता 350 रुपये फी भरा म्हणत अनेकजणांकडून पैसे गोळा करत होता व वीस तारखेनंतर पेटी, मीटर घराबाहेर बसवले जाईल असे सांगत होता. त्यांचेकडे एका सिध्दनेर्ली गावातील ६०० विदयुत घरगुती ग्राहकांची यादी होती ती यादी, सही नसलेले कोटेशन तो सर्वाना दाखवत होता. यापुर्वी सदर तेरवाडकर नामक व्यक्ती बिल वाटप, मिटर रिडींग घेत असलेने लोकांचा पटकन विश्वास बसुन लोक त्याला पैसे देत होते एका गल्लीतच त्यांने पाच ते सात हजार रूपये जमा केलेचे समजते याबाबत शंका आल्याने महावितरणचे सिध्दनेर्ली येथील अधिकारी अभिलाष बारपात्रे यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी असे कोणतेही अधिकृत पत्र अथवा परवानगी दिली नससून लोकानी त्याला पैसे देवु नयेत. ज्यांच्याकडून त्यांने पैसे घेतले आहेत त्यांनी रीतसर तक्रार अर्ज द्यावा म्हणजे कायदेशिर कारवाई करता येईल असे सांगितले.
