वाट्याला येतील त्या जागा १०० टक्के जिंकण्याचा प्रयत्न करा : जयंत पाटील

बांबवडे : भाजपच्या अपयशाचा, महागाईचा पाढा लोकांच्या पुढे वाचा. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ लोकांच्यापर्यंत जाऊन पोहोचवा आणि येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाताना वाट्याला येतील त्या जागा १०० टक्के जिंकण्याचा प्रयत्न करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.

बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे शाहुवाडी व पन्हाळा तालुक्यातील राष्ट्रवादी परिवार संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लकर, रणवीरसिंग गायकवाड हे प्रमुख उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुथ कमिटया तयार करा व त्या माध्यमातून प्रत्येक घराघरात पोहचुन लोकांची कामे करा. त्यामुळे हेच लोक भविष्यातील तुमची ताकद बनवून पक्ष वाढीला मदत करतील.

      हसन मुश्रीफ म्हणाले, पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येक गावात राष्ट्रवादीची ताकद वाढवा, या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा. यानंतर मानसिंगराव गायकवाड यांना कोठे संधी द्यायची याचा आम्ही निश्चितपणे विचार करू. तसेच जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाडहे  होतकरू असून राष्ट्रवादी बळकट करायची असल्यास त्यांना सर्वांनी साथ द्यावी म्हणजे भविष्यात राष्ट्रवादीचे नेतृत्व करण्यास ते सक्षमपणे तयार होतील.

      यावेळी बाबासाहेब पाटील, रणवीरसिंग गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे, संतोष धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मेहबूब शेख, रोहित पाटील, महादेवराव पाटील, योगीराज गायकवाड, सक्षणा सलगर, अजित पाटील पृथ्वीराज खानविलकर आदीसह मान्यवर उपस्थित होते.

🤙 9921334545