राजर्षि शाहू गव्हमेंट सर्व्हंटस बँकेच्या अध्यक्षपदी शशिकांत तिवले; उपाध्यक्षपदी रमेश घाटगे

कोल्हापूर : येथील राजर्षि शाहू गव्हमेंट सर्व्हंटस को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी शशिकांत दिनकर तिवले यांची तर उपाध्यक्षपदी रमेश गणपती घाटगे यांची बिनविरोध निवड झाली.

अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची सभा सहाय्यक निबंधक अधिन जिल्हा उपनिबंधक प्रदिप मालगावे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. अध्यक्षपदासाठी शशिकांत तिवले यांचे नांव मधुकर श्रीपती पाटील यांनी सुचविले त्यास संचालक सदानंद वसंतराव घाटगे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी रमेश गणपती घाटगे यांचे नाव अतुल गणपतराव जाधव यांनी सुचविले त्यास विलासराव शंकरराव कुरणे यांनी अनुमोदन दिले.

संचालक अतुल गणपतराव जाधव, विलासराव शंकरराव कुरणे, मावळते उपाध्यक्ष संजय सर्जेराव खोत यांनी मनोगत व्यक्त केले. सहकार्य वृत्तीने बिनविरोध निवड केलेबद्दल नूतन अध्यक्ष शशिकांत दिनकर तिवले व उपाध्यक्ष रमेश गणपती घाटगे यांनी सर्व संचालकांनी सोपविलेल्या जबाबदारीचे सर्वतोपरी सार्थक करु असे मनोगत व्यक्त करून आभार मानले. बँकेचे मावळते अध्यक्ष रविंद्र वसंतराव पंदारे यांचे हस्ते सभाध्यक्ष प्रदिप मालगावे यांचा सत्कार करणेत आला.

यावेळी बँकेचे संचालक रविंद्र पंदारे, मधुकर पाटील, विलासराव शं. कुरणे,  सदानंद व घाटगे,  प्रकाश भि.पाटील, संचालिका सौ. हेमा सु. पाटील, सौ. मनुजा शै. रेणके, संचालक संजय स. खोत, किशोर रा. पोवार,  अरविंद भि. आयरे हे उपस्थित होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश रा. शिंदे यांनी आभार मानले.

🤙 9921334545