मुंबई : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीत विजयी झालेल्या श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याह्स्ते जयश्री जाधव यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाधव यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या!
यावेळी सौ.रश्मी ठाकरे, खासदार संजय मंडलिक माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, शिवसेना संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार आदी उपस्थित उपस्थित होते.
महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्र पक्षाच्यावतीने या निवडणुकीत सर्वांनी आपले योगदान दिलेले आहे. शिवसेना पक्षाच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेस पक्षातर्फे मुख्यमंत्री ठाकरे यांचे आभार मानले.
दरम्यान, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आमदार जयश्री जाधव व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते