गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

सातारा : आक्षपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सातारा पोलिसांच्या कोठडीत असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज (सोमवारी) त्यांना न्यायालयात हजर केले असता सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सरकारी पक्षाने केलेली पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.

दोन वर्षांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी एका खाजगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्याविरोधात आक्षेपार्ह्य वक्तव्य केले होते. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त भावना तयार झाल्या होत्या. दरम्यान सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणीच गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती.

🤙 9921334545