किरीट सोमय्यांकडून १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा; संजय राऊत यांचा आरोप

मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज शिवसेनेचा नवा घोटाळा बाहेर काढण्याचा इशारा दिला असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी “विक्रांत नंतर आता टॅायलेट घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा देत सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.

राऊत यांनी आपण लवकरच सोमय्या कुटुंबाचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार असून यामध्ये १०० कोटींहून अधिकचा अपहार झाल्याचा आरोप मुंबईमध्ये आज पत्रकारांशी बोलताना केला. राऊत म्हणाले, आता मी सोमय्या कुटुंबाचा एक टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा टॉयलेट घोटाळा झाला आहे. म्हणजे कुठे कुठे पैसे खातात पाहा, विक्रांतपासून ते टॉयलेटपर्यंत” असं म्हणत राऊत यांनी सोमय्या कुटुंबावर निशाणा साधला आहे. “हे किरीट सोमय्याच आहेत. यासंदर्भातील सगळी कागदपत्र सुपूर्द झालेली आहेत.