मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे कारस्थान ; सोमय्या सूत्रधार : राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबई : मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं सादरीकरण भाजपने तयार केले असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. माझा हा गौप्यस्फोट नसून, हे सत्य आहे. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगून या कटाचे सूत्रधार भाजप नेते किरीट सोमय्या तसेच वारणसीमधील एक व्यक्ती आणि भाजपशी संबधीत एक मोठा मुंबईतील एक बिल्डर असल्याचे राऊत म्हणाले.

मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याचे कारस्थान सुरु असून मुंबईतील काही धनिक, बिल्डर यांच्या संगनमताने सोमय्या याचे नेतृत्व करत आहेत. मुंबई कशी केंद्रशासित करता येईल, यासंदर्भात सोमय्यांसह काही जणांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला एक सादरीकरण दिले आहे. त्यांना मुंबईतील मराठी माणसाचा अधिकार काढायचा आहे. मुंबईवर केंद्राचे राज्य आणायचे आहे. यासाठी पैसे गोळा करण्याचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. हा महाराष्ट्रद्रोह असल्याचा आरोप करून संजय राऊत म्हणाले, खोट्या कागदपत्रांबरोबरच या कटकारस्थानासाठीही किरीट सोमय्या दिल्लीला जात असतात.

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. किरीट सोमय्यांनी नौटंकी बंद करावी. त्यांनी विक्रांतसाठी गोळा केलेल्या पैशाचा हिशोब द्यावा असेही राऊत यावेळी म्हणाले. प्रश्न तुम्ही विक्रांतच्या नवे पैसे गोळा केले की नाही एव्हढाच आहे. बाकी तपास पोलीस करतील. तुम्ही देशाला आणि महाराष्ट्राला फसवत आहात. भाजपचे नेतेलोक जर सोमय्यांचे समर्थन करत असतील तर कश्मीर फाईलप्रमाणे विक्रांत फाईलसुद्धा तयार करावी लागेल, त्यामुळे देशद्रोहाचे समर्थन करु नका, असंही राऊत म्हणाले.

🤙 9921334545