संभाजीनगरात अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश

    कोल्हापूर :  मैलखड्‌डा, संभाजीनगर येथे अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार होता. बालविवाह करण्यात येणाऱ्या मुलगीचे वय १५ वर्षै ६ महिने  होते.  बालिकेचा दि. ५ एप्रिल रोजी साखरपुडा झाला होता व बालविवाह करण्यात येणार होता. हा बालविवाह रोखण्यास जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयास यश आले आहे.   

  पोलिस विभागातील हेड कॉन्सटेबल रमेश डोईफोडे, संस्थात्मक संरक्षण अधिकारी (जिल्हा बाल संरक्षण कक्ष), सुलभा माने, चाईल्ड लाईनच्या तेजस्वी विजय मदने. (व्हालेंटियर), व (टिम मेंबर) सुरैय्या मकबुल शिकलगार अशी टीम तयार करुन घटनास्थळी भेट देण्यात आली. बालिकेच्या हातात हिरव्या बांगडया भरल्याचे निदर्शनास आले.  प्रथम बालिकेबरोबर संवाद साधला असता काल दि. ०५ एप्रिल रोजी साखरपुडा झाला असल्याचे बालिकेने सांगितले. 

 बालिकेच्या आईने बालिकेचे वडील व्यसनी आहेत. कामावर गेल्यावर मुलगी एकटी घरी असते. इ. ९ वी मध्ये शिकत आहे. पण शाळेत जात नाही. तिला शालेय शिक्षणाची आवड नाही असे सांगितले.  तसेच बालिकेचे लग्न ठरलेला मुलगा वय २२ हा बालिकेच्या घराजवळ राहतो. त्यांना ही बोलवण्यात आले. बालिकेचे आधार कार्ड पाहिले असता बालिकेची जन्म तारीख ही माहे सप्टेंबर २००६ असल्याने बालिका अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. विभागातील अंगणवाडी सेविका व सुपरवायझर यांनाही बोलावण्यात आले. बालिकेच्या पालकांना व मुलाच्या पालकांना बालविवाह करणे हा कायदयाने गुन्हा आहे. याबाबत सुलभा माने, संस्थात्मक संरक्षण अधिकारी (जिल्हा बाल संरक्षण कक्ष) यांनी  समुपदेशन केले.

            संस्थात्मक संरक्षण अधिकारी (जिल्हा बाल संरक्षण कक्ष)  सुलभा माने यांनी पालकांचे समुपदेशन व मार्गदर्शन केले. यामध्ये बाल कल्याण समिती अध्यक्ष व सदस्य, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, पोलिस विभागातील हेड कॉन्सटेबल रमेश डोईफोडे, चाईल्ड लाईनच्या कु. तेजस्वी विजय मदने. (व्हालेंटियर), व सुरैय्या मकबुल शिकलगार (टिम मेंबर) यांचे सहकार्य लाभल्याचे महिला बाल विकास अधिकारी शिल्पा व्ही. पाटील यांनी सांगितले.

🤙 9921334545