न्यू पॉलिटेक्निकच्या प्राचार्यपदी डॉ. संजय दाभोळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकच्या प्राचार्यपदी डॉ. संजय दाभोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. संजय दाभोळे यांची एक दूरदृष्टी असलेले उत्तम प्रशासक, तंत्रशिक्षणासोबतच इतरही शैक्षणिक शाखांमध्ये धोरणात्मक निर्णय घेऊन उत्कर्ष साधणारे प्राचार्य म्हणून ख्याती आहे. न्यू पॉलिटेक्निकच्या प्राचार्य पदासोबतच त्यांची श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या संस्थेमध्ये ‘विकास अधिकारी’ म्हणूनही नियुक्ती झाली आहे. संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील यांनी नवनियुक्त प्राचार्य डॉ. संजय दाभोळे यांचे स्वागत केले. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ. सविता पाटील, सेक्रेटरी मेटील आणि सर्व स्टाफ उपस्थित होता. सूत्रसंचालन प्रा. मोहन शिंदे यांनी केले.

🤙 9921334545