कर नाही त्याला डर कशाला : चंद्रकांतदादांचा संजय राऊत यांना टोला

कोल्हापूर : संजय राऊत असे कोणी महान नेते नाहीत,  जगातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या राज्याध्यक्षांनी त्यांच्यावर प्रतिक्रिया द्यावी. कर नाही त्याला डर कशाला, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावला.

चंद्रकांतदादा यांनी कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार बैठकीत बोलत होते. ते म्हणाले, ईडी, सीबीआय त्यांची त्यांची कामे करत असतात. तुम्हाला कारवाई चुकीची वाटत असेल तर तुम्ही न्यायालयात जावे. एक पैशाचाही भ्रष्टाचार केलेला नाही, असे पत्रकारांना कशाला सांगता. प्रॉब्लेम नाही तर मग घाबरता कशाला, अशी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

चंद्रकांतदादा म्हणाले, एकत्रित सत्ता असतानाही त्यांचे रोज एक प्रवचन असायचे. त्यांनी आम्हाला भरपूर मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या शब्द प्रभुत्वावर पुस्तक लिहिण्याचे काम मी एकाला दिले आहे. त्यांच्यावर जे संस्कार आहेत.  या जन्मी कराल ते या जन्मीच फेडायचे आहे. पाण्यात कितीही घाण केली तरी ती वर येतेच, असा टोलाही त्यांनी लगावला.

🤙 8080365706