कोल्हापूर : शेतकरी संघटनेने माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला कोल्हापूर उतर विधानसभा मतदार संघासाठी संधी दिली आहे. मी या संधीचे सोने करणार आहे. उतर विधानसभा मतदारसंघाला मॉडेल बनवणार असून कोल्हापूरला उद्योग हब करणार असल्याचे शेतकरी संघटनेचे उमेदवार राजेश नाईक यानी सांगितले.
नाईक म्हणाले, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळणार असून त्यांच्या मालास योग्य भाव मिळवून देणार आहे. काहीं बँका, शेतकऱ्यांना, उद्योजकाना त्रास देतात. म्हणून उद्योजक बाहेर राज्यात चालले आहेत. त्यांना सवलती देण्यासाठी प्रयत्न करणार असून कोल्हापूर हे उद्योग हब बनवणार आहे. मतदार बंधू-भगिनींनी संधी दिल्यास संधीचे सोने करुन दाखवतो, असे नाईक यांनी सांगितले.