राधानगरी, भुदरगड तालुक्यातील 52 लाभार्थ्यांना घरकुले मंजूर : आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी (प्रतिनिधी) :ग्रामीण भागातील धनगर, भोई, वडार शिकलगार, आदी भटक्या या प्रवर्गातील घटकांसाठी राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यास सुरुवात झाली असून या योजनेअंतर्गत राधानगरी व भुदरगड तालुक्यातील 52 कुटुंबाना 1 लाख 20 प्रमाणे 62 लाख 40 हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेतून धनगर,  भोई, वडार, शिकलगार  आदी भटक्या समाजाला घरबांधणीसाठी लाभ दिला जातो. या योजनेतून 1 लाख 20 हजार रुपये घरकुल बांधणेसाठी शासनामार्फत दिले जातात. धनगर,  भोई, वडार, शिकलगार  आदी भटक्या या प्रवर्गातील कुटुंबांचे राहणीमान उंचावणे,  त्यांच्या उत्त्पनाचे स्त्रोत वाढून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी ग्रामीण भागामध्ये अशा कुटुंबांना 269 चौरस फुट ची घरे दिली जातात. या योजनेअंतर्गत राधानगरी व भुदरगड तालुक्यातील 52 लाभार्थ्यांचे प्रस्ताव गेल्या 2 ते 3 वर्षापासून कोरोना महामारी व निधी नसल्यामुळे शासनाकडे मंजूरीसाठी प्रलंबित असल्याने या कुटुंबांची अडचण होत होती. यामुळे संबंधितांना लाभ मिळावा व प्रस्तावांना तातडीने मंजुरी मिळवी याकरीता आमदार प्रकाश आबिटकर यांनी इतर विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडे वारंवार पाठपुरावा करून या घरकुलांना मंजुरी मिळवून दिले आहे त्याबाबतचा शासन निर्णय 31 मार्च विषय 22 रोजी निर्गमित करण्यात आला असून त्याआधारे या सर्व कुटुंबीयांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे गुढीपाडव्यानिमित्य या सर्व कुटुंबियांना गोड भेट देण्याचे काम आमदारांनी यानिमित्ताने केले आहे.

यामध्ये राधानगरी तालुक्यातील घुडेवाडी-1, कुकुडवाडी-3, शिरगाव-1, तारळे खुर्द-2, कसबा वाळवे 1, सरवडे-2, चांदेकरवाडी-2, अर्जुनवाडा-1, राधानगरी-3, रामणवाडी-10, कोनोली तर्फ असंडोली-3 असे 30 लाभार्थी व भुदरगड तालुक्यातील फये-1, वेसर्डे-2, गारगोटी-8,  दासेवाडी-2, मानवळे-1, राणेवाडी-1, आदमापूर-1, भाटीवडे-1, महालवाडी-1, शेणगांव-1, नवले-1, आंतुर्ली- 2 असे 22 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली.