शिराळा : महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद यांच्यासह इतरांनी स्वातंत्र्यासाठी योगदान दिले, देश उभारणीसाठी कष्ट केले त्यांचा सन्मान, आदर ठेवण्याऐवजी त्यांच्यावर टिका टिपण्णी करणं यावर धन्यता मानणारं नेतृत्व आज दुर्दैवाने देशात बघायला मिळतंय. त्याचा परिणाम लोकांमध्येही एकप्रकारची अस्वस्थता आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शिराळा येथील शेतकरी मेळाव्यात केले.
माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्या उपस्थितीत भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांनी आपले विचार मांडले.
पवार म्हणाले, देशामध्ये धर्माच्या नावावर माणसांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करून नागरिकांमध्ये अंतर निर्माण करण्याचे काम केले जात आहे असा थेट आरोपही शरद पवार यांनी केला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुश्मिता जाधव, आमदार अरुण लाड, युवक नेते विराज नाईक आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.