जयसिंगपूर : जयसिंगपुरात दहावीचा आज बुधवारी होणारा विज्ञान आणि तंत्रज्ञान-२ विषयाचा पेपर फुटल्याची बातमी पसरली होती. मात्र पेपर फुटला नसल्याचा खुलासा परिक्षा मंडळाने केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आज बुधवारी दहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान- भाग २ या विषयाचा पेपर होणार होता. मात्र, हा पेपर काल रात्रीच काही विद्यार्थ्यांच्या हाती पडला होता. ही बाब जयसिंगपूर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास दिली. या पेपरची फक्त ५०० रुपयात विक्री झाल्याची चर्चा होती. याबाबत पोलिसानी तपास सुरु केल्यानंतर हा पेपर जुना असून त्यावरील बदलुन सोशल मिडीयावर व्हायरल केल्याचे लक्षात आले. पेपर फुटला नसून कोणीतरी हा खोडसाळपणा केल्याचा खुलासा परीक्षा मंडळाने केला आहे.