गडहिंग्लज : येथील दसरा चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्या नजीक गडिंग्लज मधील विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे खासदार संभाजीराजे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.
जनता दलाचे माजी आमदार गोड साखरेचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे राष्ट्रवादीचे वसंतराव यमगेकर किरणराव कदम जनता दलाचे बसवराजख नगावे उपनगराध्यक्ष बंटी कोरी भाजपाचे राजेंद्र तारळे काँग्रेसचे बसवराजआजरी मारुती कांबळे सह महाविकास आघाडी भाजपा शिवसेना तालुक्यातील कार्यकर्ते गडिंग्लज नगरपालिकेतील नगरसेवकानी आंदोलनात सहभाग घेउन पाठिंबा दिला.