कोल्हापूर: महावितरण कडील विविध प्रश्नांवर विद्युत कंत्राटदारानी एकजूट ठेवून काम करावे असे आवाहन कोल्हापूर जिल्हा विद्युत पुरवठा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चाळके यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा विद्युत पुरवठा कंत्राटदार संघटनेची सभा आज पार पडली.त्यावेळी ते म्हणाले की छोटे मोठे कंत्राटदार असा भेदभाव न ठेवता एकजूट ठेवून सहकार्य करावे. यावेळी उपस्थित कंत्राटदारानी विविध प्रश्न मांडले त्यावर चर्चा करून एकजुटीने काम करावे असा निर्णय शेवटी झाला.या बैठकीला ४० कंत्राटदार उपस्थित होते .