कोल्हापूर : जिल्हा परिषद येथे क्षयरोग जनजागृतीपर बोर्ड (स्टँडी) व एल. ई. डी. सरकते संदेश यांचे उदघाटन उपाध्यक्ष जयवंत शिंपी व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण तसेच शशिकांत खोत,विजय पाटील,अमर पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. यु.जी.कुंभार उपस्थित होते. या जनजागृतीपर बोर्ड व सरकते संदेश लावण्याचा उद्देश हा सर्वसामान्य लोकांमध्ये क्षयरोगविषीयी जनजागृती करणे व क्षयरोगाची लक्षणे, उपचार, टी.बी. विषयक शासकीय योजना,व क्षयरोग नोटिफिकेशन कायदा या विषयी माहिती कळणे हा मुख्य हेतू असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी सांगितले.
क्षयरोग जनजागृतीपर बोर्ड वर निःशुल्क रोगनिदान व औषधोपचार माहिती, निक्षय पोषण योजनेतंर्गत क्षयरुग्णाचा उपचार पूर्ण होईपर्यंत रु. ५०० पोषण आहारासाठी आर्थिक मदत (शासकीय व खाजगी दवाखान्यातील) रुग्णाच्या खात्यात जमा करणे, क्षयरुग्णाची नोंद कार्यक्रमातंर्गत करणाच्या वैदयकीय व्यावसायिकास रु. ५०० मानधन व क्षयरुग्णाचा उपचार पूर्ण करुन घेतल्यास पुन्हा रु. ५०० मानधन, क्षयरूग्णाचा उपचार यशस्वीपणे पूर्ण करणाच्या उपचार सहाय्यकास रुग्णामागे रु. १००० मानधन आदी सुविधा विषयक माहिती तसेच रुग्णांची नोंद न केल्यास संबंधित खाजगी रुग्णालयांना व वैदयकीय व्यावसायिकांना भारतीय दंड संहिता (१८६० च्या ४५) च्या कलम माहिती २६९ आणि २७० च्या अतंर्गत शिक्षा होऊ शकते. याबाबत माहिती दिली आहे.