गेली अनेक महिन्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना आता ओमिक्रोन विषाणूने डोकं वर काढलं आहे . महाराष्ट्र आता ओमिक्रोनचे रुग्ण वाढतच चालेले असून ,ओमिक्रोन ने महाराष्ट्राचे चांगलेच टेंशन वाढले आहे .दिवसभरात महाराष्ट्रात आणखी ७५ रुग्ण सापडल्यामुळे ,आता आरोग्य यंत्रणेचं पुन्हा टेंशन वाढला आहे .
ओमिक्रोनच्या रुग्ण संख्येत आता रोजच भर पडत चालली आहे .दिवसभरात महाराष्ट्रात आता ७५ रुग्ण आढळले असून , महाराष्ट्रात आता ओमिक्रोन चे एकूण ६५३ रुग्ण झाले आहेत .हे सर्व अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिले असून ,आता मुंबई ४० ,ठाणे ९ पुणे ८ पनवेल ५ नागपूर आणि कोल्हापूर मध्ये प्रत्येकी ३ असे रुग्ण आढळून आले आहेत.