कोल्हापूर:वर्षभर मुलांसोबत पालकांनीही खूप कष्ट घेतले रात्री जागरणं, क्लासेस, अपेक्षा, स्वप्नं पण एक गोष्ट आपण विसरत चाललो आहोत मार्क म्हणजे आयुष्य नाही, आणि परीक्षा म्हणजे व्यक्तिमत्त्वाचं मोजमाप नाही.

उद्या जर लेकराला अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाले,तर घरात शांतता नको… समजूत हवी.टोमणे नको आधार हवा.
राग नको, संवाद हवा.
कारण तो १८ वर्षांचा जीव आधीच घाबरलेला असतो.मी आई-बाबांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही ही भावना त्याला आतून पोखरत असते.
आणि आपणच जर त्याला दूर केलं तर तो एकटाच पडतो. आणि आघडीत घडतं.
लक्षात ठेवा,
तुमचं लेकरू ‘मार्क्स’ नाही…
ते तुमचं स्वप्न आहे, तुमचं भविष्य आहे, तुमचा अभिमान आहे.
आंध्रप्रदेशमधील त्या वडिलांसारखं व्हा…
ज्यांनी मुलगा नापास झाल्यावरही पार्टी ठेवली आणि म्हणाले
“आज तो नापास झाला असेल, पण जीवनाच्या परीक्षेत तो नक्की जिंकेल.पुढील वर्षी प्रयत्न करून पास होईल. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एका माथेफिरू मुख्याध्यापकांन आपल्याच पोटच्या गोळ्याला खाजगी परीक्षेला मार्क कमी पडले म्हणून रागाच्या भरात मारलं आणि त्या लेकराचा जीव गेला आता ते लेकरू पुन्हा नाही त्या मुख्याध्यापकाला बाप म्हणून पश्चाताप होत नसेल निश्चितच होत असेल आणि म्हणून उद्या आनंदी राहा. मार्क म्हणजे आयुष्य नाही हे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा.
उद्याचा निकाल कसा ही असो तो ‘सेलिब्रेट’ करा.मुलाशी बोला त्याला मिठी मारा.त्याच्या गालाचा एक किस घ्या. डोक्यावर हात फिरवा. तो तुमचाच अंश आहे हे विसरू नका.
त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहा.
कारण एक प्रेमळ शब्द, एक समजूतदार स्पर्श एखादं आयुष्य वाचवू शकतो.
चला, निकाल नव्हे…
आपल्या मुलांच्या आयुष्याचा उत्सव साजरा करूया.
