कोल्हापूर:
महाराष्ट्राचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहर NSUI आयोजित सतेज सेवा सप्ताह याचा समारोह मा.शाहू छत्रपती महाराज जी,मा.जयशंकर पाठक जी, श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, मा.सुनील मलके जी, मा. राहुल वरदा जी, मा.ऋतुराज पाटील जी, मा.सचिन भाई चव्हाण मा.राजेश लाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या सेवा सप्ताहामध्ये महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना योगा वर्ग, प्राणी व मनुष्य यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी पाणवठा, पर्यावरणपूरक पक्षांची घरटी बनवण्याची कार्यशाळा, पन्हाळा किल्ल्यावरील बुरुजांची स्वच्छता, विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबीर इत्यादी उपक्रम या सप्ताहात घेण्यात आले.
या समारोह वेळी मा.सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब यांचे महाराष्ट्राच्या विकासाचा वटवृक्ष असे ‘रचना शिल्पाचे’ अनावरण करून त्यांना भेट देण्यात आले.
यावेळी NSUI चे कार्यकर्ते उपस्थित होते.
