एनआयटीत विद्यार्थिनींसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

कोल्हापूर:आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोल्हापूर आणि श्रेयस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ व २४ मार्च रोजी एनआयटीच्या अंतर्गत समिती व एनसीसी विभागाच्या वतीने विद्यार्थिनींसाठी डॉ. अमिता पतके (MBBS, DGO) यांचे एचपीव्ही लस व सर्वांगीण स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन सत्र आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले.

 

 

याचा लाभ २५७ विद्यार्थिनींनी घेतला. शिबीरात श्रेयस मल्टीस्पेशालिटी टीमकडून विद्यार्थिनींचा रक्तदाब, बीएमआय व बीएसएल तपासून त्यानुसार प्रत्येक विद्यार्थिनीला तज्ज्ञांकडून आरोग्य सल्ला देण्यात आला. अंतर्गत समितीच्या पीठासन अधिकारी प्रा. प्राजक्ता पाटील व एनसीसीच्या सीटीओ प्रा. माधुरी पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. या उपक्रमासाठी संचालक डॉ. संजय दाभोळे यांचे मार्गदर्शन तर अधिष्ठाता प्रा. बाजीराव राजीगरे यांचे सहकार्य लाभले.

🤙 8080365706