महिला दिनानिमित्त नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी केला प्र.क्र. ६ व ७ मधील कामगार महिलांचा सत्कार..

कोल्हापूर:जागतिक महिला दिनानिमित्त आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन आणि नगरसेवक ऋतुराज राजेश क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून आज कोल्हापूर महानगपालिका प्र. क्र. ६ व प्र. क्र. ७ मधील महिला सफाई कर्मचाऱ्यांचा अनोखा सत्कार करण्यात आला.
या महिलांना काम करत असताना उन्हापासून संरक्षण व्हावे या हेतूने सनकोट, टोपी आणि ग्लोज चे नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेविका सौ.मंगल साळोखे,सौ. दिशा क्षीरसागर, सौ.पूजा क्षीरसागर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

 

प्रभागाच्या स्वच्छतेसाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या सफाई कामागर महिलांच्या मुळेच नागरिकांचे आरोग्य चांगले राहते, तसेच प्रभागाची देखील स्वच्छता चांगल्या प्रकारे होते. अशा या सफाई कामगार महिला माता भगिनी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला असून भविष्यात देखील अशाप्रकारे उपक्रम राबवू, अशी ग्वाही नगरसेवक श्री.क्षीरसागर यांनी दिली.

कार्यक्रमाला शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख सौ.पवित्रा रांगणेकर,शहर संघटक श्रीमती पूजाताई भोर, सौ. गौरी माळदकर,
सौ. सुनिता भोपळे, सौ. पूजा कामते,युवतीसेना शहरप्रमुख सौ. नम्रता भोसले, सौ. तेजस्विनी घाडगे,वल्लरी वाले यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कामगार महिला उपस्थित होत्या…

🤙 8080365706