कोल्हापूर : महानगरपालिकेच्या नगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचा आढावा आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी घेतला. ही बैठक दुपारी आयुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी सर्व संबंधित विभागांनी उर्वरीत कालावधीत वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, थकबाकी असलेल्या व्यवसायीक मिळकती सील कराव्यात तसेच इतर मिळकतींवर बोजा नोंद करण्याच्या स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या.

नगररचना विभागाने आजअखेर ८२ कोटी रुपयांची वसुली केली असून उर्वरित २८ कोटी रुपये मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना उपशहर रचनाकारांना देण्यात आल्या. त्यासाठी विशेष वसुली कॅम्प आयोजित करण्याचे निर्देशही देण्यात आले. नगररचना विभागातील प्रत्येक अभियंत्याने त्यांना देण्यात आलेले वसुलीचे उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक असून उद्दिष्ट पूर्ण न केल्यास संबंधितांची इतर विभागात बदली करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला. त्यामुळे सर्व अभियंत्यांनी ३० मार्चपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश देण्यात आले.
घरफाळा विभागाचे १११ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून आजअखेर ५८ कोटी ८० लाख रुपये जमा झ
