कागलमधील ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्री हसन मुश्रीफ व राजे समरजितसिंह घाटगेंनी मानलेआभार

कागलकागल तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या युतीने सहा जिल्हा परिषद व अकरा पंचायत समिती मतदारसंघांमध्ये घवघवीत विजय मिळवत इतिहास घडविला. या ऐतिहासिक यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची सदिच्छा भेट घेत आभार मानले.
या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोघांचेही अभिनंदन करत कागल तालुक्यात युतीने मिळविलेल्या यशाचे विशेष कौतुक केले. कागल नगरपालिकेतील एकतर्फी विजयापाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतही भाजप–राष्ट्रवादी युतीने आपले वर्चस्व सिद्ध केल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून मंत्री हसन मुश्रीफ, शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या युतीने कागल विधानसभा मतदारसंघात विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. संघर्षाऐवजी समन्वय व समझोत्यातून जनतेच्या हितासाठी काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कागल विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप–राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासह विविध विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही,अशी ग्वाही दिली.
या भेटीद्वारे कागल तालुक्यातील जनतेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुढील काळात अधिक वेगाने विकासकामे राबविण्याचा संकल्प युतीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

🤙 8080365706