गिजवणे- कडगाव मतदारसंघात औद्योगिक प्रकल्प आणून हजारो बेरोजगारांना रोजगार देणार;मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

गिजवणे:
गिजवणे- कडगाव मतदारसंघात औद्योगिक प्रकल्प आणून हजारो बेरोजगारांना रोजगार अशी ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. गिजवणे येथील सभेला लोकगंगेला आलेला महापूर पाहून या मतदारसंघातील सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार याची खात्री झाली आहे, असेही ते म्हणाले.

गिजवणे- कडगांव जिल्हा परिषद मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ. शैलजा सतीश पाटील, गिजवणे पंचायत समितीच्या उमेदवार सौ. सुनीता सचिन देसाई, कडगाव पंचायत समिती मतदार संघाच्या उमेदवार सौ. प्रियांका नवज्योत देसाई यांच्या प्रचारार्थ गिजवणे ता. गडहिंग्लज येथे आयोजित जाहीर प्रचारसभेत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर म्हणाले, मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली गिजवणे- कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलला. सर्वच लोककल्याणकारी योजना घराघरापर्यंत आणि वाड्यावस्त्यांपर्यंत पोहोचविल्या. गावोगावी जलजीवन योजना तयार करून पाण्यासाठी वणवण करणाऱ्या माता-भगिनींच्या डोक्यावरची घागर कायमची उतरली, याचे फार मोठे आत्मिक समाधान आहे.

समाजकारणासाठी सदैव तत्पर….!
जिल्हा परिषद उमेदवार सौ. शैलजा पाटील म्हणाल्या, नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांच्या माध्यमातून मी गावागावात वाड्या-वस्त्यांवर पोहोचलेली आहे. महिला आत्मनिर्भर होऊन स्वतःच्या पायावर आर्थिकरित्या सक्षमपणे उभे राहाव्यात यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. निव्वळ मतांसाठी नव्हे तर कायमस्वरूपी संपर्कात असणारी मी आहे. समाजकारणासाठी मी कायमच तत्पर आहे. तुमचे मत वाया जाऊ देणार नाही.

मताधिक्यांचा विक्रम होईल……!
श्री. मुश्रीफ म्हणाले, आजवर मी पंचगंगेला आलेला महापूर बघितला होता. हिरण्यकेशीला आलेले महापूर बघितले आहेत. परंतू; गिजवणेतील या प्रचार सभेला पाच हजारावर उपस्थितीने लोकगंगेला आलेला महापूर पाहिल्यानंतर माझी खात्री झाली आहे की, गिजवणे- कडगाव मतदार संघातील सर्वच उमेदवारांच्या मताधिक्यांचा विक्रम होईल.

व्यासपीठावर गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश तुरबतमठ, उपनगराध्यक्ष महेश सलवादे, प्रकाशभाई पताडे, हिरलगेचे सरपंच सचिन देसाई, ऐनापूरच्या सरपंच सौ. उषा मांगले, बेकनाळचे सरपंच आनंदा पाटील, इंचनाळचे सरपंच उत्तम कांबळे, अनुप पाटील, टी. एस. देसाई, महादेव केसरकर, सदानंद पाटील, बंटी पाटील, अशोक कुरळे, अशोकराव खोत, सयाजी देसाई, पृथ्वीराज पाटील, विशाल देसाई, तानाजी रानगे, मिलिंद मगदूम, विजय मोहिते, संजय गाडे, गिजवणेचे उपसरपंच लक्ष्मण शिंदे, ए. आर. पाटील, शहाजी होडगे, अशोक राक्षे, भिमराव राजाराम, विकास पाटील, जितू कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.

🤙 8080365706