कसबा वाळवे मतदार संघात उमेश भोईटेंसह  शिल्पा लोकरे व  मयुरी भावके यांचे विजय हीच अजितदादा पवार व माजी आमदार नामदेवराव भोईटे यांना खरी श्रद्धांजली

कसबा वाळवे:
कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदार संघ बिद्री साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतो. दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय कै. अजितदादा पवार नेहमीच बिद्री साखर कारखान्याच्या पाठीशी हिमालयासारखे राहिले. तसेच; दिवंगत आमदार नामदेवराव भोईटे यांचे या परिसराच्या सर्वांगीण विकासामध्ये मोठे योगदान आहे. त्यांना सगळ्या विभागाची माहिती आणि प्रशासनावरही वचक होता. या मतदारसंघातील जिल्हा परिषद उमेदवार उमेश नामदेवराव भोईटे, कसबा वाळवे पंचायत समिती मतदार संघाच्या उमेदवार सौ. शिल्पा सचिन लोकरे व तुरंबे पंचायत समिती मतदार संघाच्या उमेदवार सौ. मयुरी सागर भावके यांचे प्रचंड मताधिक्याने विजय हीच स्वर्गीय अजितदादा पवार व स्वर्गीय नामदेवराव भोईटे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे भावनिक आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कसबा वाळवे ता. राधानगरी येथे कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवारांच्या जाहीर प्रचार सभेत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.

मंत्री श्री. मुश्रीफ भाषणात पुढे म्हणाले, कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदार संघ हा माझ्या तालुक्याला लागूनच आहे. स्वयंपूर्ण आणि सर्वांगीण विकासासाठी हा जिल्हा परिषद मतदार संघ मी दत्तक घेतो. तुम्ही या सर्व उमेदवारांना संधी द्या, विकासकामांसाठी मी निधी कमी पडू देणार नाही. जनतेने दिलेल्या संधीच्या माध्यमातून आरोग्य, प्राथमिक शिक्षण, स्वच्छता, पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधा ते वाड्या- वस्त्यांपर्यंत पोहोचवतील.

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, कसबा वाळवे हे गाव कर्तुत्ववान माणसांची खाण आहे. या गावासह परिसराने नेहमीच पुरोगामी चळवळीला ताकद दिलेली आहे. कै. नामदेवराव भोईटे यांच्यासारख्या सामान्य कुटुंबातील माणसाला या गावाने राज्याच्या विधिमंडळात पाठविले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रूपाने उमेश नामदेवराव भोईटे, सौ. शिल्पा लोकरे व सौ. मयुरी भावके यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन या गावासह पंचक्रोशीने क्रांती करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

म्हणून बिद्री लय भारी…..!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, स्वर्गीय अजितदादा पवार शेतकऱ्यांच्या श्रमाचे मंदिर असलेल्या बिद्री साखर कारखान्याच्या नेहमीच पाठीशी राहिले. काही कि-यानिष्ठांनी बिद्रीवर प्रशासक आणण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी अजितदादा पवारच या सगळ्या संचालक मंडळाच्या पाठीशी ठाम उभे राहिले. बिद्री साखर कारखान्याला एनसीडीसीमधून कर्जही उपलब्ध करून दिले. ज्या-ज्यावेळी कारखान्याला अडचणी आल्या, त्या-त्यावेळी त्यांनी सहकार्य केले. त्यामुळेच बिद्री “लय भारी….” ठरला.

यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किसनराव चौगुले, भगवानराव पाटील, गणपती महेकर, नाना पाटील, विश्वास पाटील, शिवाजी फराकटे, फिरोजखान पाटील, अशोक चौगुले, विष्णू बारड, विष्णू शेळके, दीपक किल्लेदार, अनिल चव्हाण, अनिल जाधव, सतीश पाटील आदी प्रमुखांसह इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706