कागल :शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य घोडागाडी शर्यतीत कागलच्या भारत व हाबऱ्या या जोडीने उत्कृष्ट कामगिरी करत ‘शाहू केसरी’ किताबासाठीची चांदीची गदा पटकावली. हंचिनाळ (ता. निपाणी) येथील माळावर पार पडलेल्या या थरारक स्पर्धेमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते झाले. यावेळी बेळगाव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
स्पर्धेत कुरुंदवाडच्या लाट देवा व कॅप्टन या जोडीने द्वितीय क्रमांक मिळविला, तर कागलच्या वीरा व रुई तेजा या जोडीने तृतीय क्रमांक पटकावला.
कागल येथील हणबर गल्ली, कट्टा सर्कल, तालीम मंडळ व शर्यतप्रेमींच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चार गटांत पार पडलेल्या या स्पर्धेत साठहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेत पारंपरिक घोडागाडी शर्यतीचे सौंदर्य अनुभवायला दिले.
*विभागनिहाय विजेते :
आदत घोडा-बैल गट :
रामा जैनवाडी, नितीन ब्याकुडे, साई डोणे
एक्का घोडागाडी गट :
फ़ंटया (इचलकरंजी), संदेश फोटो, ओंकार कासोटे
नवतर घोडागाडी गट :
साई डोणे, कॅप्टन व लगमान देवा, अक्षय डोंगरे
जनरल घोडागाडी गट :
मंगल प्रेमी, आदमापूर बाला, अनिकेत गुरव
जनरल गट :
कुरुंदवाड मल्हार व मंगल टू (सांगलीवाडी), आदमापूर हेलिकॉप्टर बाला व लगमान असमान्या
स्पर्धेचे नियोजन चेतन भगले,साई डोणे,आश्विनकुमार नाईक,ओंकार भुरले,आदित्य हुच्चे,महेश खोत,गौरव ब्याकुडे आदींनी केले.
