साके येथे सौ. सुयशा घाटगे, दत्तात्रय दंडवते यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा;अंबरिषसिंह घाटगे यांच्या हस्ते शुभारंभ

साके:साके (ता. कागल) येथे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदार संघाच्या उमेदवार सौ. सुयशा अंबरिषसिंह घाटगे आणि पंचायत समितीचे उमेदवार दत्तात्रय रावण दंडवते यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली. श्री. म्हसोबा देवालयामध्ये अंबरिषसिंह घाटगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. गावातील प्रमुख मार्गांवरून ही पदयात्रा काढण्यात आली. उमेदवारांसह तिन्ही गटांचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. हातामध्ये पक्षाचे झेंडे आणि विजयाच्या घोषणांनी साके परिसर दुमदुमून गेला होता. उमेदवारांनी घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना मान्यवरांनी विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी बाळासाहेब तुरंबे, किरण पाटील, शहाजी पाटील, नानासो कांबळे, ज्ञानदेव पाटील, चंदर निऊंगरे, सी. बी. कांबळे, दतात्रय सातुसे, बापूसो पाटील, रंगराव चौगले, बाजीराव चौगले, डि. एस. कांबळे, तानाजी चौगले, पा. वि.पाटील, विक्रम चौगले, सरपंच अंजली कांबळे, आक्काताई चौगले, वैजयंती चौगले, संपदा पाटील, वत्सला पाटील, सरिता चौगले, शरण्या घाटगे व मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

🤙 8080365706