नगरसेवकांनी आपल्या भागामध्ये संपर्क कार्यालय निर्माण करावे, खासदार धनंजय महाडिक यांची सूचना

कोल्हापूर:नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील सर्व महानगरपालिकेत च्या महापौर पदाचे आरक्षण  जाहीर करण्यात आले आहे. या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवड संदर्भात तसेच निवडून आलेला 26 नगरसेवकांमधून भारतीय जनता पक्षाचा गटनेता निवडण्यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.

या निवड प्रक्रियेमध्ये लोकशाही पद्धतीने सर्व नगरसेवकांना आपल्याला अपेक्षित असलेला गटनेता व सभागृह नेता यांची नावे सुचवावी याबद्दल माहिती खा.धनंजय महाडिक यांनी दिली. त्यानंतर ही सर्व नावे एकत्रित करून भाजपा कोअर समितीची बैठक घेऊन ही सर्व नावे भाजपा प्रदेश कार्यालयाकडे मुंबई येथे पाठवण्यात आलेली आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी भाजपा गटनेता व सभागृह नेत्याचे नाव वरिष्ठांकडून प्रदेश स्तरावरून लवकर घोषित करण्यात येईल. असे खा. धनंजय महाडिक यांनी सांगितले.

ही बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या प्रभागाच्या विकासासंदर्भात तसेच नियोजित आराखड्यासंदर्भात आणि निवडणुकीदरम्यान जो जाहीरनामा घोषित करण्यात आला होता तो पूर्णत्वास आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करूया तसेच प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या भागामध्ये एक संपर्क कार्यालय तयार करून नागरिकांच्या सेवेसाठी एक केंद्रस्थान निर्माण करावे याबद्दल सूचना नूतन नगरसेवकांना देण्यात आल्या.

यावेळी आमदार  अमल महाडिक,  महेश जाधव,प्रा. जयंत पाटील सर यांच्यासह नूतन नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

🤙 8080365706