शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार होणार… शिवसेनेचा महापौर होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर  : या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवीत शिवसेनेने घवघवीत यश संपादित केले आहे. कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर व्हावा, हे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. त्यांचे विचार घेवूनच शिवसेनेचे शिलेदार काम करत असून, या कामाच्या रूपानेच जनतेने शिवसेनेवर विश्वास दाखविला. नॅचरल जस्टीस प्रमाणे शिवसेनेचा महापौर होणार हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नसल्याचे सांगत कोल्हापूरवासियांनी वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल आभार व्यक्त करीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

आज शिवसेनाप्रमुखांच्या १०० व्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी “अमर रहे अमर रहे शिवसेनाप्रमुख अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले कि, महाराष्ट्रात एकमेव कोल्हापुरातच महायुती म्हणून आम्ही निवडणुकीस सामोरे गेलो आहे. निवडणुकीच्या सुरवातीपासूनच वरिष्ठ नेत्यांसोबत महायुती होण्याकडे आम्ही वाटचाल केली. महायुतीमध्ये कोणताही वाद होऊ नये यासाठी शिवसेनेने जागा वाटपात एक पाऊल मागे घेतले. या त्यागाचा मोबदला म्हणून महापौर पद शिवसेनेला मिळणे हा आमचा ‘नैसर्गिक हक्क’ आहे. महायुतीचे संख्याबळ ४६ हे सत्तास्थापने साठी पूरक आहे. त्यामुळे महायुतीत कोणताही वाद होईल अशी कोणाचीच भूमिका राहणार नाही. गेल्या काही वर्षातील महानगरपालिकेतील पदांच्या वाटपाचा लेखाजोखा करून सर्वच पक्षांना न्याय मिळेल अशा पद्धतीने पदांचे वाटप केले जाणार आहे. स्वीकृत नगरसेवकांची पदे कायद्याची अंमलबजावणी करून निवड केली जातील. देशात, राज्यात आणि महापालिकेत महायुतीचे सरकार असल्याने विकासकामांना कोणताही निधी कमी पडणार नाही. शहरातील प्रमुख प्रलंबित प्रश्नही लवकरच मार्गी लावू. नागरिकांना सेवा पुरविण्यात शिवसेना आणि महायुतीचे नगरसेवक कमी पडणार नाहीत. शहरातील प्रश्न सोडवून सुसज्ज आणि आधुनिक कोल्हापूरची संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले.

यावेळी माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम, नगरसेवक शारंगधर देशमुख, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक अजय इंगवले, नगरसेवक आस्कीन आजरेकर, नगरसेवक सत्यजित जाधव, नगरसेवक वैभव माने, नगरसेवक स्वरूप कदम, नगरसेवक अभिजित खतकर, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेविका अर्चना पागर, नगरसेविका प्राजक्ता जाधव, नगरसेविका शिला सोनुले, नगरसेविका अनुराधा खेडकर, नगरसेविका संगीता सावंत, नगरसेविका कौसर बागवान, शहरप्रमुख रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, उदय भोसले, राहुल चव्हाण, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, अरविंद मेढे, विजय जाधव, दादा माने, महिला आघाडीच्या पूजा भोर, अमरजा पाटील, पूजा कामते, सुनिता भोपळे, पूजा आरदांडे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

🤙 8080365706