कागल पंचायत समितीच्या माजी सभापती  पूनम राहुल मगदूम- महाडिक, माजी सरपंच  सुरेखा पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचा मंडलिक गटाला रामराम

सिद्धनेर्ली:
कागल पंचायत समितीच्या माजी सभापती  पूनम राहुल मगदूम- महाडिक, सिद्धनेर्लीच्या माजी सरपंच सौ. सुरेखा दादासाहेब पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी मंडलिक गटाला रामराम ठोकला. राहुल मगदूम- महाडिक व दादासाहेब पाटील, माजी सरपंच कबीर राजाराम कांबळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची मंडलिक गटाला सोडचिट्टी देत नामदार हसनसाहेब मुश्रीफ गटात प्रवेश केला. या प्रवेशाबद्दल मंत्री  मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले.

भाषणात मंत्री  मुश्रीफ म्हणाले, कागल तालुक्यात राजकीय विद्वेषाचा फार मोठा संघर्ष होता. तो संपवण्यामध्ये मी पुढाकार घेतला. जनतेने मला आमदारकी दिल्यानंतर आपल्याकडे येईल त्या माणसाचे गट- तट, आपला -परका असा भेद न करता काम करीत राहिलो. अशा विधायक कामातूनच मी ही गटबाजी संपवली. गटात प्रवेश केलेल्या या सर्वांचाच जुन्या कार्यकर्त्यांप्रमाणेच मान सन्मान राखू. एक कुटुंब म्हणून एकदिलाने काम करूया. प्रत्येक कार्यकर्ता स्वावलंबी बनला पाहिजे या भावनेतूनच काम करीत आलो आहे.

या कार्यक्रमात मुश्रीफ गटात प्रवेश केलेल्यांची नावे अशी, सिद्धेश्वर सहकारी दूध संस्थेच्या व्हाईस चेअरमन उज्वला उत्तम पोवार, उत्तम बाळू पोवार, योगेश पोवार, संभाजी जत्राटे, अवधूत महाडिक, पोपट तवंदे, बबलू शेख, रणजित पाटील.

यावेळी सरपंच दत्ता पाटील, माजी सरपंच वाय. व्ही. पाटील, माजी उपसरपंच कृष्णात मेटील, माजी उपसरपंच मनोहर लोहार, सुधीर पाटील, मोहन लाड, रमण पाटील, पैलवान अमर पाटील, चेअरमन शिवाजी लाड, सुभाष मगदूम, युवराज खद्रे आदी प्रमुख उपस्थित होते.

🤙 8080365706