कोल्हापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर शहरासाठी मंजूर झालेला कोट्यवधींचा निधी आणि झालेली विकासकामे यामुळे जनतेने महायुतीवर विश्वास ठेवला. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पूर्ण केले. उत्तर व दक्षिण दोन्ही मतदारसंघातील प्रभागात महायुतीने संपादित केलेल्या घवघवीत यशाचे संपूर्ण श्रेय शहरवासियांचे असून, यापुढच्या काळात कोल्हापूर शहरातील राज्यातील पहिल्या दहा शहरांपैकी एक असे आधुनिक आणि सुसज्ज कोल्हापूर करून शहरवासियांचा विश्वास सार्थ ठरवू, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केला.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, केंद्रात महायुती, राज्यात महायुती त्याप्रमाणे शहराच्या विकासासाठी महापालिकेतही महायुतीच आवश्यक होती. गेल्या ५ वर्षात केलेल्या विकासकामांमुळे शहरवासियांमधून महायुतीस पाठींबा मिळत होता. मतदानाच्या निकालामध्येही याची प्रचिती दिसून आली. काही ठिकाणी महायुतीचे उमेदवार थोडक्या मतांनी पराभूत झाले असले तरी शहरवासियांनी महायुतीस स्पष्ट बहुमत दिले आहे. कोल्हापूरच्या उज्वल भविष्यासाठी महायुतीचे सर्वच नगरसेवक कटिबद्ध असतील. महायुतीला सत्तेपर्यंत पोहचविल्याबद्दल व सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल शहरवासियांचे मनपूर्वक आभार.. या निवडणुकीत इच्छुक असलेले उमेदवार, शिवसेना पदाधिकारी यांनी निवडणुकीत मोलाची भूमिका बजावली. पराभूत झालेले उमेदवारांनी नव्या उमेदीने कामाला लागावे. आगामी काळात शिवसेनेचे पराभूत उमेदवार, इच्छुक असलेले उमेदवार, पदाधिकारी यांना योग्य तो मानसन्मान देवून न्याय देवून राज्याच्या आणि शहराच्या विकासात भागीदार करून घेवू. कोणाचेही योगदान डावलले जाणार नाही. सर्वांच्या एकजुटीने शहराचा विकास साध्य करू, असा विश्वासही आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेच्या शिलेदारांची भेट घडवू : आमदार राजेश क्षीरसागर
राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवसेनेने घवघवीत यश संपादित केले आहे. खऱ्या अर्थाने हा विजय राज्यातील तमाम जनतेचा आणि खासकरून लाडक्या बहिणींचा आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यतत्परते प्रमाणे शिवसेनेचे सर्व नवनियुक्त शिलेदार प्रभागाचा आणि शहराच्या विकासास कटिबद्ध असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आशीर्वाद घेवून कोल्हापूर शहराच्या विकासाच्या नव्या पर्वाला सुरवात करण्यासाठी लवकरच शिवसेनेच्या शिलेदारांची शिंदे साहेबांशी भेट घडवून आणणार असल्याचेही आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
