खा. धनंजय महाडिक यांनी साधला प्रभाग क्रमांक 18 मधील मतदारांशी संवाद 

कोल्हापूर :सार्वत्रिक निवडणूक 2025–26 निमित्त प्रभाग क्रमांक 18 मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार धनंजय महाडिक हे विजयी निर्धार सभेला उपस्थित राहून मतदारांशी संवाद साधला.

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या विविध योजनांमुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल झाला असून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अस मत महाडिक यांनी व्यक्त केलं.

केंद्र व राज्यातील महायुती सरकारने दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला, शेतकरी यांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात ‘लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली असून मा. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात अनेक विकासकामे वेगाने सुरू आहेत, याची माहिती देण्यात आली. या निवडणुकीत प्रभाग पद्धतीने निवडणूक होत असल्यामुळे मतदारांनी गोंधळून न जाता चारही उमेदवारांना मतदान कसे करायचे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
कोल्हापूर काँग्रेसने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा हा केवळ भुलथापा असून अशा कोणत्याही भ्रामक आश्वासनांना कोल्हापूरची सुज्ञ जनता बळी पडणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला. महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देऊन जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन खा . महाडिक यांनी केले.

या प्रसंगी विधानपरिषद भाजपा आमदार मा. चित्राताई वाघ यांच्यासह महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

🤙 8080365706