कोल्हापूर: भुदरगड तालुक्यातील मिणचे खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुशोभीकरण व विस्तारीकरणाचा शुभारंभ मोठ्या आनंदात संपन्न झाला. या कामासाठी ६४ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या व आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. सुशोभीकरण व विस्तारिकरणामुळे अधिक नागरिकांना या आरोग्य केंद्राचा लाभ घेता येईल, याचा मनस्वी आनंद आहे. असे मत मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक नंदकुमार ढेंगे, बाजार समिती सदस्य कल्याणराव निकम, माजी सभापती आक्काताई नलावडे, माजी सभापती मदन देसाई, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष विक्रम पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख संदीप पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आनंद वर्धन, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप साळुंखे, डॉ. निकिता चौगले, विस्तार अधिकारी वैभव शेळोलकर यांच्यासह सूर्याजी देसाई, वसंत प्रभावळे, शरद देसाई, संतोष पाटील, अशोक भांदीगरे, रणजीत देसाई, प्रवीण नलवडे, सचिन गुरव, शामराव मोहिते यासंह मिणचे खुर्द गावचे सर्व ग्रामस्थ व आदी मान्यवर उपस्थित होते.
