कोल्हापूर:प्रभाग क्रमांक 20 मधील कोल्हापुरातील सुर्वे नगर परिसरामध्ये गेल्या तीन दशकाहून अधिक काळ काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कार्यरत असलेला स्व. बाळासाहेब साळोखे गटाने आपल्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक उपस्थित राहून सर्व कार्यकर्त्यांचे पक्षाच्या वतीने स्वागत केले. साळोखे गटाचे सामाजिक व राजकीय कार्य पाहता भाजपामध्ये नक्कीच त्यांचा योग्य सन्मान होईल.
सध्या सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 20 मध्ये या एका मोठ्या निर्णयामुळे प्रभागातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, महायुतीचे पारडे जड झाले असून या प्रभागातील माहितीचे पाचही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
यावेळी भाजपा आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, सुनिल वाडकर, अमित साळोखे, अमोल साळोखे, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
