कोल्हापूर: आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्र. क्र.३ मधील न्यू शाहूपुरी येथील मेघदूत अपार्टमेंट येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी ज्या पद्धतीने मला साथ दिली, आणि तिसऱ्यांदा या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, त्याबद्दल आभार मानून स्थानिक आमदार निधी तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून प्राप्त झालेला विकास निधी या माध्यमातून होत असलेल्या विकासावर चर्चा केली. तसेच कोल्हापूरच्या परिपूर्ण विकासासाठी निगेटिव्ह नरेटीव सेटर लोकांना बाजूला ठेवून महायुतीच्याच उमेदवारांना मत रुपी आशीर्वाद देऊन महानगरपालिकेत पाठवावे, असे आवाहन केले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, उपशहर प्रमुख विश्वजीत मोहिते, नियोजन समितीचे सदस्य अंकुश निपाणीकर, उमेदवार श्री. प्रमोद देसाई, सौ. वंदना मोहिते,सौ. राजनंदा महाडिक,श्री. विजयेंद्र माने,श्री.प्रसाद कामत श्री.प्रमोद अतिगरे,श्री.सचिन जाधव श्री.महेश गवळी, श्री.संदीप चिगरे, श्री.मुकुंद सावंत, श्री.बाळ मोरे, श्री.संदीप पोवार,श्री. पराग शाह, श्री. प्रमोद शाह,श्री. दिनकर सावंत, श्री. खंगले यांच्यासह भागातील नागरीक उपस्थित होते…
