कोल्हापूर:कागल येथील श्रद्धा कॉलेज ऑफ नर्सिंग या संस्थेला बी.एस्सी. नर्सिंग (B.Sc. Nursing) या पदवी अभ्यासक्रमासाठी अधिकृत मान्यता मिळाल्याने कागल व परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या महत्त्वपूर्ण यशाबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांनी संस्थेने भेट घेवून आभार मानले.
या मान्यतेमुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार नर्सिंग शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून आरोग्य सेवेत कुशल मनुष्यबळ निर्माण होण्यास मोठा हातभार लागणार आहे.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मुजावर, उपाध्यक्ष मुजावर मॅडम तसेच कॉलेजमधील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी या यशाबद्दल संस्थेच्या नेतृत्वाचे अभिनंदन केले.
संस्थेच्या अध्यक्षांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील. शासनाच्या सहकार्यामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे.”
बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमास मिळालेली मान्यता ही श्रद्धा कॉलेज ऑफ नर्सिंगच्या शैक्षणिक वाटचालीतील एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे.
