कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक 2025–26 च्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी राज्याचे कॅबिनेटमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत कृष्णराज महाडिक यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत कोल्हापूरच्या शाश्वत व सर्वांगीण विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन मांडण्यात आला.
कोल्हापूर महानगरपालिकेतील ही ऐतिहासिक महायुती शहराच्या भविष्याला नवी दिशा देणारी ठरणार आहे. 20 प्रभागांतून 81 सुशिक्षित, सक्षम व युवा उमेदवारांच्या माध्यमातून विकासाचा आराखडा जनतेसमोर मांडत, येत्या 15 जानेवारी रोजी महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि देवेंद्र फडणवीस जी यांच्या गतिमान शासनकाळात राज्यात जसा विकास होत आहे, तसाच विकास कोल्हापूर शहरात घडवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक ,आमदार राजेश क्षीरसागर ,आमदार अमल महाडिक आणि यूथ आइकॉन कृष्णराज महाडीक यांच्यासह महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
