कसबा सांगाव येथे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

कोल्हापूर:कसबा सांगाव, ता. कागल अजिंक्यतारा कला, क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ, वाडदे वसाहत कसबा सांगाव यांच्यावतीने नववर्षानिमित्त आणि गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील (बापू) यांच्या वाढदिवसानिमित्त धरणग्रस्त मर्यादित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

यावेळी वाडदे वसाहतीत नव्याने तयार करण्यात आलेल्या भव्य ग्राउंडचे उद्घाटन फित कापून व गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील (बापू) यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला.

यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, सरपंच वीरश्री जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विकासराव पाटील, बिद्री कारखान्याचे माजी संचालक प्रविणसिंह भोसले, कागल तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक राजेंद्र माने, माजी सरपंच रणजीत कांबळे, मौजे सांगावचे सरपंच विजयसिंह पाटील, अजित शेटे, सागर माळी, के.बी.पाटील, नेमिनाथ चौगुले, दत्ता पाटील, अमोल माळी, संभाजी कोपार्डे, अरविंद माळी, शंकर पाटील, संतोष गोठणकर यांच्यासह अनेक मान्यवर, स्पर्धक, ग्रामस्थ आणि तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

🤙 8080365706