महायुतीच्या एकजुटीवर आणि जनतेच्या पाठिंब्यावर ऋतुराजचा विजय निश्चित : मंत्री प्रकाश आबिटकर 

कोल्हापूर:कोल्हापूरमध्ये महायुतीने एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, युवा सेना पश्मिम महाराष्ट्र सचिव, युवा नेते  ऋतुराज क्षीरसागर यांचा  कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ७ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला.

गेली अनेक वर्ष  ऋतुराज सर्वसामान्य जनतेमध्ये राहून सातत्याने काम करत असून जनतेशी त्याची नाळ घट्ट जुळलेली आहे. त्याची विकासाची दृष्टी आणि काम करण्याची तळमळ यामुळे जनतेचा मोठा पाठिंबा मिळतोय. महायुतीच्या एकजुटीवर आणि जनतेच्या पाठिंब्यावर त्याचा विजय निश्चित आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष मा.ना. राजेश क्षीरसागर, प. महाराष्ट्र देवस्थान समितीच्या मा. कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, माताभगिनी आणि शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहाने पदयात्रेत सहभागी होत दुधाळी येथील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.

 

🤙 8080365706