कोल्हापूर: भोगावती नदी खोऱ्यातील सिंचनापासून वंचित असलेल्या राधानगरी परिसरातील खिंडी व्हरवडे येथील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला.
या भागातील गावांचे शिवार सुजलाम–सुफलाम व्हावे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे तसेच पाण्याची कायमस्वरूपी आणि शाश्वत सोय व्हावी, या उद्देशाने जलसंपदा व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने १००% शासन अनुदानित उपसा–सिंचन योजनेच्या कामाचे सर्वेक्षण करण्यात आले.
या प्रकल्पाच्या माध्यमातून भोगावती खोऱ्यातील शेतीला नियमित पाणीपुरवठा होणार असून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडणार आहे. इतकंच नाही तर या प्रकल्पामुळे संपूर्ण परिसराच्या कृषी विकासालाही अधिक गती प्राप्त होणार आहे.
या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहकार्य करणाऱ्या शेतकरी बांधवांचे, स्थानिक लोकप्रतिनिधींचे आणि अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.
