कोल्हापूर: आज सकाळी 8 :15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पितळी गणपती, पोस्ट ऑफिस चौक, आरटीओ ऑफिस येथे आ.सतेज पाटील यांनी सकाळी फिरायला येणाऱ्या लोकांशी संवाद साधला. महालक्ष्मी इडली सेंटर येथे नाष्टा करत कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासाबद्दलच्या नागरिकांच्या भावना, संकल्पना आणि अपेक्षा जाणून आ.सतेज पाटील यांनी घेतल्या. कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्स! अशी साद घालून कोल्हापूरच्या विकासाचा विश्वास नागरिकांना दिला.
