कोल्हापूर: नुकतीच शिवाजी चौगले व पंडित चौगले यांच्या गुराळ घराला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट दिली. गुराळ घर म्हणजे केवळ गुळाचं उत्पादन नाही, तर ग्रामीण अर्थकारणाला बळ देणारा आधार आहे. गूळ हा शरीरासाठी ऊर्जादायी, पचनासाठी हितकर आणि जीवनशैलीला नैसर्गिक वळण देणारा आहे. आज जिथे ‘Health Conscious Living’ ही गरज बनली आहे, तिथे सेंद्रिय गूळ हा पर्याय नाही तर तो उपाय आहे. या सेंद्रिय गुळाचं योग्य ब्रँडिंग म्हणजे गावातील कष्टांना बाजारात ओळख मिळवून देणं.
सेंद्रिय गूळ म्हणजे गोड चव, निरोगी जीवन आणि समृद्ध गाव यांचा सुंदर संगम. या भेटीतून सेंद्रिय गुळाचं खरं मोल समजलं. रसायनमुक्त पद्धतीने तयार होणारा हा गूळ आरोग्यदायी जीवनशैलीचा एक भाग आहे.
याप्रसंगी तेजस चौगले, प्रकाश पाटील, विश्वनाथ पाटील, अजित पाटील, सागर कासोटे, मच्छिंद्र म्हाकवेकर, तुकाराम पाटील, दत्तात्रय यादव आदी उपस्थित होते.
