उचगाव फाट्यावर आराम बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

उचगाव:कोल्हापूरहून हुपरीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या आराम बसने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने दुचाकीचालक रमेश हरिचंद्र राठोड (वय५४, रा. शिंदे कॉलनी उचगाव) जागीच ठार झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी पावणे सहाच्या दरम्यान उचगाव फाट्यावर स्वागत कमानीजवळ झाला. मृत रमेश राठोड केएमटीमध्ये बसचालक म्हणून सेवेत होते.
सकाळी रमेश राठोड दुचाकीवरून (एम एच ०९ डी टी १७९१) कामावर जात होते. याच वेळी कोल्हापूरहून हुपरीकडे भरधाव जाणाऱ्या आराम बसने (एन एल o१ बी ५१५१) उचगाव कमानीजवळ राठोड यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. डोक्यासह हातापायांना गंभीर दुखापत झाल्याने राठोड जागीच ठार झाले.#
आराम बसचालक प्रशांत जळबा गोटरे (वय ३४, रा. करंजी, ता. जळकोट, जि. लातूर) यास गांधीनगर पोलिसांनी बेदरकार व निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल अटक केली आहे. याबाबतची फिर्याद अक्षय राजू जाधव (वय २५, रा. शिंदे कॉलनी उचगाव) यांनी दिली. याबाबत गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास फौजदार विजय कोळी करत आहेत.रमेश राठोड उचगाव येथील साई मंदिर व टी ए बटालियन येथील शिवमंदिरात पुजारी म्हणून सेवा करत होते. ‘एक राखी जवानांसाठी’हा उपक्रम राबवण्यात त्यांचा पुढाकार असे. त्यांच्या अपघाती निधनाने परिसरात शोककळा पसरली.
रमेश यांचे पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी, दोन मुले असा परिवार आहे

 

🤙 8080365706