कोल्हापूर महापालिकेसाठी इच्छुकांचे काँग्रेस पक्षाला प्राधान्य! शहरातील 20 वॉर्डातील मुलाखती संपन्न!

कोल्हापूर:

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शहरातील 10 ते 20 वॉर्डातील काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज काँग्रेस कमिटी कार्यालयात संपन्न घेतल्या. ऋतुराज संजय पाटील यावेळी उपस्थितीत होते.

काल पासून सुरु असलेल्या मुलाखत प्रक्रियेत इच्छुक उमेदवारांचे सामाजिक कार्य, जनसंपर्क, पक्षनिष्ठा, तसेच स्थानिक प्रश्नांबाबतची भूमिका यांचा आढावा घेण्यात आला. कोल्हापूर शहराच्या विकासासाठी लोकाभिमुख नेतृत्व देण्यावर काँग्रेस पक्षाचा भर आहे.

यावेळी शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजेश लाटकर, आनंद माने, ॲड. तौफिक मुलाणी, सरलाताई पाटील, भारती पवार, विक्रम जरग, भरत रसाळे, बयाजी शेळके, ऋषीकेश पाटील आदी उपस्थित होते.

 

🤙 8080365706