अंबप : वार्ताहर
पाडळी (ता. हातकणंगले ) येथील परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुडगूस घातला असून, रात्रीच्या सुमारास गाड्यांची चाकं आणि काही कड्डबा कुट्टी यंत्राच्या मोटारीच लंपास करत आहेत. मागील काही दिवसांपासून होणार्या चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले असून चोरटे जोमात तर पोलिस कोमात असलेली चर्चा नागरिकांच्यातून आहे.
मागील काही दिवसापासून पाडळी येथे चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. या भागातील चंदनाचे वृक्ष चोरट्यांनी पळवले होते. सध्या चोरांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वस्तूकडे वळवळत जनावरांच्या शेडमधील कडबा कुट्टी मशीनच्या इलेक्ट्रिक मोटारी रातोरात लंपास करण्यात येत आहेत. विनोद पाटील व सुधीर पाटील यांच्या शेडवरील कडबा कुट्टी मशीनच्या २ एच.पी इलेक्ट्रिक मोटर सोमवारी रात्री चोरट्याने पळाल्या. तर मिथुन पवार यांची रस्त्याखाडीला लावलेली स्प्लेंडर गाडीचे मागील चाक चोरट्यांनी पळवले आहे. या चोरांमुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून त्यांच्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात होणाऱ्या चोरांना पकडून वेळीच पायबंध घालणं गरजेचं आहे. मात्र चोरट्यांनी जणू पोलिस यंत्रणेलाच उघड आव्हान दिल्याचं चित्र निर्माण झालं आहे. नागरिकांच्या अशा वस्तू चोरी व्हायला लागल्या तर नागरिकांचा पोलिसांवरील विश्वासालि तडा जाण्याची भीती व्यक्त होत आहे
